सांगली : व्हसपेठला सात लाखांच्या मोटारसायकली जप्त; एकास अटक

सांगली : व्हसपेठला सात लाखांच्या मोटारसायकली जप्त; एकास अटक

जत शहर : व्हसपेठ येथे एका शेतात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी छपा टाकून एका मोटारसायकल चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून १२ मोटरसायकलीसह किमती मोबाईल असा सात लाखांचा माल जप्त केला. मोदीनसाब सरदारसाब वालीकर (वय २७, हैनाळ, ता. इंडी विजापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक अच्युत सूर्यवंशी, पोलिस कॉ. वैभव पाटील, आमसिध्दा खोत, अमोल ऐदाळे यांनी ही कारवाई केली

संशयित मोदीन वालीकर याने कर्नाटकातील विजापूर येथील ठिकाणाहून दहा मोटरसायकलींची चोरी केली होती. तसेच अथणी, कोकटनूर येथील यात्रेतून मोबाईल चोरून आणले आहेत. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. वालेकर याल ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील चोरीच्या मोटरसायकल सापडल्या. त्याने एका शेतात लपवून ठेवल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news