सांगली : मिरजेत ४१ हजाराचा चार किलो गांजा जप्त

सांगली : मिरजेत ४१ हजाराचा चार किलो गांजा जप्त
Published on
Updated on

मिरज : पुढारी वृत्तसेवा : येथील मार्केट यार्ड जनावर बाजार आवारात गांजा विक्रीसाठी आलेल्या हुसेन बाशा सय्यद (वय २६, रा. कैकाडी गल्ली, मिरज) याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचा चार किलो गांजासह मोटरसायकल व मोबाईल असा ८८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मिरजेतील मार्केट यार्ड, जनावर बाजार आवारात शुक्रवारी रात्री एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांना माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक अन्नछत्रे यांच्या पथकाने जनावर बाजार आवारात सापळा लावला. यावेळी शुक्रवारी रात्री (एमएच १० सीएफ ६३७२) या मोटारसायकलवरून एकजण गांजा विक्रीस आल्याचे निदर्शनास आले. पथकाने त्याच्यावर छापा टाकून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४१ हजार रुपये किमतीचा चार किलो १०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजासह मोटरसायकल, मोबाईल असा ८८ हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सय्यद यास अटक केली.. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news