सांगली : भाळवणीत 36 लाखांची वीज चोरी

सांगली : भाळवणीत 36 लाखांची वीज चोरी

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा पोल्ट्री फॉर्ममधील विद्युत मीटरमध्ये फेरफार करून 35 लाख 77 हजार 110 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी पोल्ट्री मालक अय्याज मुल्ला (रा. विटा भाळवणी, ता. खानापूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महावितरणचे अंकुश तारळेकर यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, अय्याज मुल्ला यांनी 19 ऑगस्ट 2020 ते 19 ऑगस्ट 2022 या दोन वर्षाच्या काळात विद्युत मीटरमध्ये फेरफार करून 35 लाख 77 हजार वीज चोरी करून महावितरणची फसवणूक केली आहे. पोलिसांनी मुल्ला याच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करून तो विटा पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

दरम्यान, महावितरणने सर्वत्र वीज चोरी शोधण्यासाठी पथके नेमली आहेत. यामध्ये दररोज लाखो रुपयांची वीज चोरी उघडकीस येवू लागली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news