

जत शहर ः जत शहरातील दत्त कॉलनीतील डॉ. किशोर शहा यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज लपांस केला. शनिवारी रात्री ही घटना घडली. डॉ. शहा हे मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घर फोडून घरातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.