सांगली : घनकचरा व्यवस्थापन ठप्प; अवमान याचिकापूर्व नोटीस

सांगली : घनकचरा व्यवस्थापन ठप्प; अवमान याचिकापूर्व नोटीस

सांगली; पुढारी वृत्तसेवा : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय हरित प्राधिकरणने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण विभाग यांना अवमान याचिकापूर्व नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मूळ याचिकाकर्ते प्रा. आर. बी. शिंदे यांनी दिली.

याचिकाकर्ते प्रा. शिंदे यांच्यातर्फे अ‍ॅड. ओमकार वांगीकर यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दि. 29 डिसेंबर 2016 रोजी आदेश दिला होता. या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जास्तीत- जास्त मार्च 2018 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होते. पण अद्याप त्याची सुरुवातही झालेली नाही, अशी माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.

बेडग रोड तसेच समडोळी रोड येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोतील कचर्‍याला वारंवार आग लागते. त्याचे प्रदूषण परिसरातील लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. डेपोतील कचर्‍याला आग लागू नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांचे आरोग्य व प्रदुषणणाचा विचार करता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखून ठेवलेल्या 60 कोटी रुपयांच्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे, अशी मागणीही प्रा. शिंदे यांनी केली. या वेळी आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर, अ‍ॅड. ओमकार वांगीकरण उपस्थित होते.

विलगीकरण नाही होत

कचर्‍याचे कुठल्याही प्रकारचे विलगीकरण होत नाही. गोळा केलेला सर्व कचरा तसाच कचरा डेपोवर टाकला जातो. कचरा डेपोला एकाच बाजूला संरक्षक भिंत आहे. उवर्र्रित तीनही बाजू मोकळ्या सोडल्या असल्याकडे प्रा. शिंदे यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news