सांगली : कामेरीत जखमी गवा जेरबंद

सांगली : कामेरीत जखमी गवा जेरबंद
Published on
Updated on

 येडेनिपाणी: पुढारी वृत्तसेवा : गेली तीन- चार दिवस कामेरी (ता. वाळवा) येथे जखमी अवस्थेत फिरणाऱ्या गव्यास पकडण्यात सोमवारी वन विभागाला यश आले. या गव्याला जेरबंद केल्यानंतर त्याच्यावर रात्रीपर्यंत उपचार सुरू होते. उपचारानंतर त्याला अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, विभागाकडून सांगण्यात वन आले. गव्याला पकडल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कामेरी येथील फडतरे मळ्यात गेल्या तीन- चार दिवसापासून गवा रेड्याचे दर्शन होत होते. याबाबत वनविभागाला कल्पना देण्यात आली होती. या गव्याच्या पायाला जखम झाल्याने तो शांतपणे वावरत होता. त्याने कोणाला इजा केली नव्हती.  तसेच पिकांचेही नुकसान केले नव्हते. महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेमुळे त्याच्या पायाला दुखापत झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रेस्क्यू ऑपरेशन राबवत जखमी अवस्थेत असलेल्या या गव्याला सोमवारी दुपारी वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. त्यानंतर त्याला क्रेनद्वारे वनविभागाच्या वाहनातून हलविण्यात आले. त्याच्यावर डॉक्टरांच्या पथकाने उपचार सुरू केले आहेत. या परिसरात असलेले उसाचे क्षेत्र, लगतचा महामार्ग व लोकवस्ती यामुळे गव्याला पकडण्यात अडचणी येत होत्या.

राजा पकडापूक्त खडवाणी अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास माडकर, वनरक्षक रायना पाटोळे, अमोल साठे, प्रकाश येडेनिपाणी : गव्याला जेरबंद केल्यानंतर क्रेनद्वारे वाहनात ठेवण्यात आले. पाटील, हणमंत पाटील, वनमजूर शहाजी पाटील, डॉ. संतोष वाळवेकर, वन्यजीव प्रेमी सुशीलकुमार गायकवाड, अमित कुंभार यांच्या पथकाने गव्यास सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गवा सुस्थितीत झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news