‘मोक्का’तील फरारी गुंडाला अटक; संशयित भोसेतील

‘मोक्का’तील फरारी गुंडाला अटक; संशयित भोसेतील

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याकडील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांर्गत कारवाई करण्यात आलेला फरारी गुंड शक्ती सुभाष पवार (वय 20, रा. भोसे, ता. मिरज) याला शुक्रवारी अटक करण्यात आली. पवार याच्याविरूद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यापूर्वी त्याच्या टोळीविरूद्ध 'मोक्का'तंर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीतील साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र पवार हा फरारी झाला होता.

दोन-तीन वेळा अक्कलकोट पोलिस त्याच्या शोधासाठी सांगलीत येऊन गेले होते. मात्र तो सापडत नव्हता. शुक्रवारी तो वड्डी (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतजवळ उभा असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला पकडले. त्याला पुढील तपासासाठी अक्कलकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, हवालदार आर्यन देशिंगकर, निलेश कदम, मेघराज रुपनर, संदीप नलवडे, राजू मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news