मिरज : तीन महिलांचा सहा साड्यांवर डल्ला; गुन्हा दाखल

मिरज : तीन महिलांचा सहा साड्यांवर डल्ला; गुन्हा दाखल
Published on
Updated on

मिरज : पुढारी वृत्तसेवा : शहरातील हरेमाधव दुकानात साडी खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन महिलांनी 18 हजार 600 रुपये किंमतीच्या सहा साड्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आकाश सभागचंद आहुजा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील किसान चौकात हरेमाधव राज सारीज नावाचे आकाश आहुजा यांचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानात साड्या खरेदी करण्यासाठी दि. 29 ऑक्टोबररोजी तीन महिला आल्या होत्या.

साड्यांचे अनेक नमुने पाहत असताना कामगाराची नजर चुकवून तीन महिलांनी सहा नग साउथ रेशीम सिल्क साड्या अंगावर नेसून आलेल्या साडीमध्ये लपवून पलायन केले. दि. 1 नोव्हेंबर रोजी सीसीटीव्ही कॅमेरा तपासात असताना हा चोरीचा प्रकार निर्दशनास आला. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news