मिरज : कर्नाटकने सुरू केल्यास महाराष्ट्रात पॅसेंजर सुरू

मिरज : कर्नाटकने सुरू केल्यास महाराष्ट्रात पॅसेंजर सुरू
Published on
Updated on

मिरज पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी हे पुणे-कोल्हापूर दुहेरीकरणासह विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मिरज स्थानकाला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटकने सुरू केल्यास महाराष्ट्रातून देखील पॅसेंजर गाड्या सुरू होतील, असे आश्वासन दिले.

लाहोटी यांनी पुणे-कोल्हापूर स्थानकादरम्यान विंडो निरीक्षक कोचमधून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची पाहणी केली. मंगळवारी सकाळी विशेष रेल्वे कोल्हापूर स्थानकात गेली. तेथील पाहणी दौर करुन लाहोटी मिरजेत आले.
त्यांनर रनिंग रुम, सीसीटीव्ही कक्षाची पाहणी केली. तसेच रेल्वेकडून प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांची माहिती
घेतली.

मिरज आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनांनी लाहोटी यांची भेट घेतली. यावेळी कोरोना काळापासून बंद असलेली पॅसेंजर तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी लाहोटी यांनी पॅसेंजर सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाचा आहे. राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यास तातडीने ती सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

तसेच सामान्य प्रवाशांसाठी आता एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अनारक्षित तिकिट सेवा सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने बहुतांश रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

कर्नाटक विभागीय रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरू केल्यानंतर पुणे विभागातूनही गाड्या सुरू करू. त्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पथक तपासणीसाठी कराड व पुण्याकडे रवाना
झाले.

दरम्यान, लाहोटी यांचा हा पूर्णपणे प्रशासकीय दौरा होता. त्यांनी दौर्‍यादरम्यान केवळ शासकीय कामांचा आढावा घेतला. यावेळी पुणे विभागाच्या विभागीय रेल प्रबंधक रेणू शर्मा उपस्थित
होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news