सांगली : भोंदूबुवासह सात जणांनी 15 लाख घेतले वाटून!

सांगली : भोंदूबुवासह सात जणांनी 15 लाख घेतले वाटून!

सांगली ः पुढारी वृत्तसेवा पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील सुनील व्हटकर यांच्याकडून 15 लाखांची घेतलेली रोकड भोंदूबुवासह सात जणांनी वाटून घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. भोंदूबुवा रोहित बेन्नाळकर उर्फ शंकर महाराज, संदीप पाटील, रोहित ऐवळे, अरूण कोरे, बादशहा पाथरवट व त्याची पत्नी आसमा या सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. शिवानंद हाचंगे (सोलापूर) हा अजूनही फरारी आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

व्हटकर यांच्याकडून संशयितांनी 15 लाख रुपये घेतले होते. या रकमेचे सर्वांनी समान वाटप केले. शंकर महाराज याच्यासह चौघे सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्यांच्याकडून 15 लाख रुपये वाटून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. आणखी कोणाची त्यांनी अशाप्रकारे फसवणूक केली आहे का, याबद्दल चौकशी केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news