‘धूमस्टाईल’ प्रकार : नांद्रेत महिलेची बोरमाळ हिसडा मारून पळविली; अज्ञाताविरूद्ध गुन्हा

‘धूमस्टाईल’ प्रकार : नांद्रेत महिलेची बोरमाळ हिसडा मारून पळविली; अज्ञाताविरूद्ध गुन्हा

सांगली : पुढारी वृत्तसेवा शेतात काम करून घरी निघालेल्या नांद्रे (ता. मिरज) येथील गंगुबाई प्रकाश मुळे (वय ६१ ) या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची बोरमाळ चोरट्याने हिसडा मारून लंपास केली.

नांद्रे- बिसूर रस्त्यावर नांद्रे गावच्या हद्दीत दि. २६ डिसेंबर रोजी दुपारी 'धूमस्टाईल' हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगुबाई यांचे नांद्रे- बिसूर रस्त्यावर शेत आहे. दि. २६ रोजी सकाळी त्या नातवाला घेऊन शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घरी येत होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून संशयित चोरटा आला. त्याने गंगुबाई यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसडा मारून लंपास केली.

अवघ्या काही क्षणात हा प्रकार घडल्याने गंगुबाई व त्यांचा नातू घाबरले. रस्त्यावर वर्दळही नव्हती. दोघे तातडीने घरी गेले. घरातील लोकांशी चर्चा करून त्यांनी शुक्रवारी फिर्याद दाखल केली. चोरटा २० ते २५ वयोगटातील होता, असे गंगुबाई यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news