तासगाव : कुमठेतील द्राक्ष बागायतदारांची 11 लाखांची फसवणूक

तासगाव : कुमठेतील द्राक्ष बागायतदारांची 11 लाखांची फसवणूक

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : कुमठे (ता. तासगाव ) येथील तीन द्राक्ष बागायतदारांची द्राक्ष व्यापार्‍याने 11 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत मनोहर हणमंत पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. याप्रकरणी आशिफभाई तांबोळी बागवान (रा. बागवान गल्ली, सूरत, गुजरात) या द्राक्ष व्यापार्‍यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेल्यात फिर्यादी मनोहर पाटील यांच्यासह महेंद्र रावसाहेब घाटगे व पांडुरंग नारायण पाटील या द्राक्ष बागायतदारांचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : संशयित तांबोळी बागवान याने फिर्यादी मनोहर आणि महेंद्र रावसाहेब घाटगे व पांडुरंग पाटील याची 2019 च्या द्राक्ष हंगामात द्राक्षे खरेदी केली होती. त्यावेळी द्राक्ष व्यापारी आशिफ तांबोळी याने तिघांना थोडे थोडे पैसे दिले होते. त्यानंतर संशयिताकडे मनोहर यांचे 3 लाख 16 हजार, महेंद्र घाटगे याचे 2 लाख 95 हजार तर पांडुरंग पाटील यांचे 5 लाख, असे अकरा लाख अकरा हजार रुपये येणे बाकी होती. गेल्या तीन वर्षांपासून हे शेतकरी संशयिताकडे पैशांची मागणी करीत होते .

परंतु बागवान हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. संशयिताने आपली फसवणूक केल्याचे या शेतकर्‍याच्या लक्षात आल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news