कवठेमहांकाळ: अलकूडजवळ अपघातात दोन ठार

कवठेमहांकाळ: अलकूडजवळ अपघातात दोन ठार

कवठेमहांकाळ पुढारी वृत्तसेवा :  कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील अलकूड (एस) (ता. कवठेमहांकाळ) फाट्यावर सोमवारी सकाळी छोटा हत्ती टेम्पो व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात श्रीधर सुरेश अक्की (वय 24, रा. बिजरगी, ता. जि. सोलापूर) व परसू नागाप्पा बडीवडर हे दोघे ठार झाले. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

श्रीधर व त्याचा मित्र परसू हे मोटारसायकल (केई 28, ई. व्ही. 3670) वरून जतहून कवठेमहांकाळच्या दिशेने निघाले होते. ते अलकूड (एस) फाट्यावर आले असता छोटा हत्ती टेम्पो (एम. एच. 10, सी. आर. 6052) हा रांजणीकडे जात असताना अपघात झाला.

या अपघातात गंभीर मार लागल्याने श्रीधर हा जागीच ठार झाला. तर परसू हा गंभीर जखमी झाला. परसूला मिरज येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. टेम्पोचालक राहुल हरीश कुंभार (रा. नांगोळे) याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news