इस्लामपूर : पाण्यासाठी इस्लामपूरमध्ये मोर्चा

इस्लामपूर : पाण्यासाठी इस्लामपूरमध्ये मोर्चा

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील प्रभाग क्र. 6 मधील चाँदतारा मोहल्ला येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने तसेच नागरी सुविधा मिळत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला.

विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा पोलिसांनी पालिकेच्या दारातच अडविला. आठ दिवसांत हा प्रश्न निकाली निघाला नाही तर टोकाचे आंदोलन करण्याचा इशारा विक्रम पाटील यांनी दिला.

यावेळी बोलताना विक्रम पाटील म्हणाले, पालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे हे आपल्या कर्तव्यापासून दूर राहत आहेत. नागरिक तक्रारी घेऊन गेले तरीही मुख्याधिकारी भेटत नाहीत. चाँदतारा मोहल्ला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई आहे. पालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरात रस्ते, गटारींचा प्रश्नही प्रलंबित आहे. गटारींच्या दुरवस्थेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे.

यावेळी नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पालिका विभागाचे अभियंता मोहन जाधव यांना दिले. येत्या 8 दिवसांत हा प्रश्न निकाली निघाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी धनराज पाटील, मोहसीन पटवेकर, अर्जुन पाटील, निवास पाटील, मोहन वळसे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news