आवाडेंना शिक्षणसेवा, बोरगावेंना मरणोत्तर जीवनगौरव

आवाडेंना शिक्षणसेवा, बोरगावेंना मरणोत्तर जीवनगौरव
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणसेवा पुरस्काराने तर, दिवंगत बापूसाहेब बोरगावे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
दरम्यान रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्रीमती कळंत्रेअक्का श्राविकाश्रामाच्या नूतन वास्तूचे पवार त्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.20 व्या शतकातील शांतिसागरजी महाराज यांच्या मराठी व कन्नड भाषेतील जीवनचरित्राचे प्रकाशन उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अधिवेशनात सभेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेक्षनीय कार्य करणार्‍यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये बी. बी. पाटील समाजसेवा पुरस्कार प्रा. आप्पासाहेब मासुले (कसबे डिग्रज), पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी समाजसेवा पुरस्कार छाया पाटील (कामेरी), आचार्य कुंदकुंद प्राकृत ग्रंथ संशोधन व लेखन पुरस्कार डॉ. सी. पी. कुसुमा (श्रवणबेळगोळ), आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार प्रा. श्रीधर हेरवाडे (कोल्हापूर), आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार मोहन शास्त्री (म्हैसूर) यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. डी. एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार डॉ. विजय पाटील (सोलापूर), श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी आदर्श संस्था पुरस्कार सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था (कवठेएकंद), प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार कुंतीनाथ कलमणी (बेळगाव), प्रा. डी. ए. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार अरुणा चौगुले (मौजे डिग्रज), बाळ पाटील सोशल कल्चरल अवेअरनेस अवॉर्ड डॉ. अजित मुरगुंडे (बंगळूर), सुलोचना सि. चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार काव्यश्री नलवडे (जयसिंगपूर), दानोळी श्रमणरत्न आचार्यश्री 108 सुबलसागर महाराज त्यागी सेवा श्रावक पुरस्कार सुहास पाटील (बोलवाड), श्रीमती धन्नाबाई गंगवाल त्यागी सेवा महिला पुरस्कार शोभा सुंदरलालजी पाटणी (जालना), डॉ. एन. जे. पाटील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दादासाहेब पाटील (दुधगाव), प्राचार्य जी. के. पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार राजकुमार चौगुले यांना, प्रेमाबाई जैन आदर्श माता पुरस्कार आक्काताई बेळकुडे (जयसिंगपूर), चंपतराय अजमेरा युवा पुरस्कार मोहन नवले (अंकलखोप), सावित्रीबाई राघोबा रोटे आदर्श युवती पुरस्कार सुप्रिया पाटील (पेठवडगाव) यांना प्रदान करण्यात आला. स्व. वालुबाई शिवलाल शहा प्राणीमित्र पुरस्कार यशवंत सुर्वे (बैरागवाडी), विशेष सेवा पुरस्कार कुलभूषण बिरनाळे (अब्दुललाट) यांना देण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news