

सांगली : जिल्हा परिषदेमधील वित्त, बांधकाम, जलसंधारण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य अशा सात विभागातील 9 कर्मचार्यांच्या प्रशासकीय आणि 37 जणांची विनंती अशा, एकूण 46 जणांची समुपदेशन करून बुधवारी बदल्या करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहामध्ये बुधवारी बदली प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदल्या करण्यात आल्या. विनंती बदली आणि प्रशासकीय बदलीमध्ये कर्मचार्यांची सोय आणि प्रशासनाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन धोडमिसे यांनी बदलीचे आदेश दिले. त्यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यावेळी उपस्थित होते.
वित्त विभागातील दोन कर्मचार्यांची प्रशासकीय आणि तिघांची विनंती बदल्या करण्यात आली. तसेच बांधकाम विभागामधील चार जणांची प्रशासकीय, तर तिघांची विनंती बदली, जलसंधारणमधील एकाची विनंती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाागतील एकाची विनंती, महिला व बालकल्याणमधील तिघांची प्रशासकीय आणि सहाजणांची विनंती, प्राथमिक शिक्षण विभागातील सहा जणांची विनंती, आरोग्य विभागामधील 17 कर्मचार्यांची विनंती बदली करण्यात आली. एकूण सात विभागातील 9 जणांची प्रशासकीय आणि 37 कर्मचार्यांची विनंती, अशा एकूण 46 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
गुरुवार, दि. 22 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 यावेळेत ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभागातील, तर दुपारी 3 ते 5 या वेळेत कृषी व सामान्य प्रशासन विभागाकडील कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत.