आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथे जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाला मोटारीने धडक देऊन तसेच कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, तसेच भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत साहिल सलमान खान (वय 22, व्यवसाय सेंट्रिंग काम, रा. यमाईनगर, दिघंची) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे नऊ वाजता साहिल खान व त्यांचा मित्र प्रवीण अंकुश मोरे हे मोटरसायकल (एमएच-12-युके-3873) वरून दिघंची एसटी स्टँड येथून घरी जाताना दिघंची-झरे रस्त्यावरील एका कार्यालयाजवळ हा प्रकार घडला.
आरोपी नईम अमिर तांबोळी, प्रथमेश अण्णा चव्हाण व प्रशांत मोरे (सर्व रा. दिघंची) यांनी संगनमत करून मोटारीतून मागून येऊन मोटरसायकलला जोराची धडक दिली. धडकेनंतर आरोपी वाहनातून उतरले व कोयत्याने साहिल यांच्या डोक्यावर तसेच उजव्या हातावर वार करत “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद आहे.

