

सांगली : लग्नाचे आमिष दाखवून मतिमंद तरुणीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत दोघांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याने ती 15 आठवड्याची गर्भवती राहिली आहे. याबाबत तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित दिशान शेख (वय 25, रा. कुंठेगाव, सोलापूर) याच्यासह एका अल्पवयीन मुलावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
22 वर्षीय तरुणी ही मतिमंद आहे. संशयित शेख व अल्पवयीन मुलगा हे मागील वर्षापासून तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेत होते. तिला लग्नाचे आमिष दाखवून कवलापूर परिसरात तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणातून तरूणी गर्भवती राहिली. 15 आठवड्याची गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला. तिने विचारपूस केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार तिच्या आईने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित दिशान व अल्पवयीन मुलगा अशा दोघांविरूद्ध बलात्कार आणि अपंग व्यक्ती अधिकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.