

तासगाव : तालुक्यातील पाचवा मैल ते तुरची फाटा दरम्यान असणार्या एका हॉटेलवर नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने तासगाव पोलिसांत दाखल केली आहे. विशाल रमेश शिरदाळे (रा. पाचवा मैल, तासगाव) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना दि. 7 मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. संशयित विशाल याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पीडित तरुणीला संशयिताने येळावी, पाचवा मैल येथून तुरची फाट्याजवळ असणार्या रस्त्याकडेच्या हॉटेलवर फ्रेश होण्याचे कारण सांगून नेले. पीडित तरुणी एका खोलीत असताना संशायितांने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित फिर्यादी तरुणीसोबत आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली असल्याचे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. तासगाव पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले व पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे तपास करीत आहेत.