

जत : उमराणी (ता. जत) येथे विजेचा धक्का बसून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मल्लाप्पा बसाप्पा शळकन्नावर (मूळ रा. नागनूर, ता. अथणी, जि. बेळगाव; सध्या रा. उमराणी, ता. जत) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
17 जानेवारीरोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उमराणी येथे मल्लाप्पा शळकन्नावर यांना विजेचा तीव्र धक्का बसला. घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. शवविच्छेदन अहवालानुसार, विजेचा धक्का बसल्यामुळेच मल्लाप्पा यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेचा पुढील तपास जत पोलिस करत आहेत.