

देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. 12 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र - देवराष्ट्रे व यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतरावांच्या जन्मघरी ‘यशवंत कविसंमेलन’ आयोजित केले आहे. साहित्यिक रघुराज मेटकरी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड उद्घाटक आहेत. कवी रमजान मुल्ला संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
या संमेलनात ज्येष्ठ विडंबनकार प्रभाकर साळेगावकर (माजलगाव), अतुल कुलकर्णी (बीड), राजेसाहेब कदम व प्रा. अनिल चवळे (अहमदपूर) यांच्यासह जिल्ह्यातील प्रतिथयश कवी सहभागी होणार आहेत. सकाळी 9.30 वाजता यशवंतरावांच्या मातोश्री विठामाता चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यानंतर जन्मघरी स्मारकामध्ये संमेलनास सुरुवात होणार आहे.