वॉनलेस रुग्णालय प्रशासनच पुन्हा चालवणार

वॉनलेस रुग्णालय चालवण्यास वेल्लोर संस्थेचा नकार : 131 वा वर्धापन दिन उत्साहात
The anniversary was celebrated with enthusiasm at Wonless Hospital here.
मिरज : येथील वॉनलेस हॉस्पिटल मध्ये वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.Pudhari Photo

मिरज, पुढारी वृत्तसेवा : मिरजेतील ऐतिहासिक असणारे वॉनलेस रुग्णालय हे आता तमिळनाडूमधील विल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजकडून चालवले जाणार नाही. त्यामुळे आता प्रशासनच हे रुग्णालय चालवणार आहे. गुरुवारी रुग्णालयाचा 131 वा वर्धापन उत्साहात साजरा झाला.

हॉस्पिटलमध्ये अडचणी आल्यानंतर ते चालवण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. तमिळनाडू येथील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचा विचार पुढे आला. कॉलेजच्या काही पदाधिकार्‍यांनी मिरजेत येऊन वॉनलेस हॉस्पिटलला भेट दिली होती. पुणे येथे वेल्लोर संस्था व वॉनलेस संस्थेच्या काही पदाधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये वॉनलेस रुग्णालय हे चालवण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानंतर मिरजेत काही कर्मचार्‍यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. या निर्णयाबाबत सोशल मीडियावरही अनेकांनी त्याचे स्वागत केले होते.

The anniversary was celebrated with enthusiasm at Wonless Hospital here.
कृष्णा प्रदूषण : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेस 90 कोटींचा दंड

मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे थकीत पगार व अन्य देणे असे सुमारे 30 कोटींहून अधिक रुपये सुरुवातीला खर्च करावे लागणार आहेत. त्या खर्चासाठी मात्र वेल्लोर संस्थेने नकार दिला. त्यामुळे आता वेल्लोर संस्था ही वॉनलेस रुग्णालय चालवणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता प्रशासनाने टप्प्याटप्प्याने हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संचालिका डॉ. प्रभा कुरेशी यांनी दिली.

The anniversary was celebrated with enthusiasm at Wonless Hospital here.
मिरज सिव्हिलमध्ये मिळणार अत्याधुनिक उपचार

लोकवर्गणीतून रुग्णालय सुरू होणार...

वॉनलेस रुग्णालय नव्याने सुरू करण्यासाठी लोकवर्गणीची गरज आहे. आता लोक वर्गणीतून या रुग्णालयातील कामे केली जाणार आहेत. त्या रुग्णालयाला मदतीचा हात देण्यासाठी इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा क्रिकेटचा सामना ही खेळवण्यात आला होता. आताही लोकवर्गणी उभारण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news