‘कस्तुरी’च्या ‘रंग बरसे’ कार्यक्रमात महिलांनी केली रंगांची उधळण

दै. पुढारी कस्तुरी क्लब व रानवारा अ‍ॅग्रो अँड रिसॉर्टतर्फे आयोजन
Islampur News |
इस्लामपूर : ‘रंग बरसे’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या पुढारी कस्तुरी क्लबच्या सभासद महिला.Pudhari Photo
Published on
Updated on

इस्लामपूर : वॉटर पार्कमध्ये महिलांनी रेन डान्सचा आनंद लुटला. रंगांची उधळण करत आणि गाण्यांच्या तालावर थिरकत मनसोक्त धमाल केली. महिलांनी डान्सबरोबरच एकमेकींसोबत सेल्फी आणि फोटो काढून या पार्टीची आठवण जपली. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला.

दै. पुढारी कस्तुरी क्लब व पन्हाळा रस्त्यावरील मानेवाडी-केर्ली येथील रानवारा अ‍ॅग्रो अँड रिसॉर्टच्यावतीने महिलांसाठी ‘रंग बरसे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इस्लामपूर शहर व परिसरातील महिला या रंगोत्सवासाठी बसमधून रवाना झाल्या होत्या. महिलांनी बसमध्येही धमाल करीत विविध गाण्यांवर रिल्स बनवत प्रवासाचा आनंद द्विगुणित केला.

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी ‘कस्तुरी क्लब’ने एकत्र आणल्याने महिलांमध्ये उत्साह दिसत होता. ‘रंग बरसे’ सोहळ्याअंतर्गत पारंपरिक आणि आधुनिक गाण्यांवर एकत्रित डान्स करून धमाल केली. वॉटर पार्कमध्ये रेन डान्सचा मनसोक्त आनंद घेतला. महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक गाण्यांवर एकत्रित डान्स केला. तसेच, डीजेच्या तालावर धमाल डान्स केला. महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक पोशाख परिधान केले होते. या रेन डान्समध्ये महिलांनी एकत्र येऊन विविध खेळांचा आनंद लुटला. डान्सबरोबरच एकमेकींसोबत सेल्फी आणि फोटो काढत रिल्स बनविल्या. रेन डान्स पार्टीमुळे महिलांना तणावमुक्त होण्यास मदत झाली. महिलांनी एकत्र येऊन सकाळी वेलकम ड्रिंकबरोबरच व्हेज पुलाव सायंकाळी वडा-पाव, चहाचा आस्वाद घेतला. तसेच मारवल मिल्कचे संचालक अनिल कदम यांनी सर्व महिलांना लस्सीचे वाटप केले. ‘कस्तुरी क्लब’ने महिलांना एकत्र केल्याने रेन डान्सचा आनंद घ्यायला मिळाला, आम्ही तणावमुक्त झालो, अशा प्रतिक्रिया सभासद महिलांनी दिल्या. या उपक्रमासाठी सुनीता महिंद, अर्चना परीट, वंदना शहा, उषा येवले, जयश्री लोंढे, वंदना फाटक, सुनीता पाटील, अर्चना उभाळे, अर्चना जंगम आदी कमिटी मेंबर्सचे सहकार्य लाभले. अधिक माहितीसाठी मधू देसावळे-8308706122 या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news