मिरज : शहरातील रमा उद्यान येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्याने तोडून निम्मे दागिने घेऊन पलायन केले. याप्रकरणी महिलेचा मुलगा विजय भार्गव मेस्त्री यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विजय मेस्त्री यांची आई दि. 13 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घराजवळच थांबली होती. त्यावेळी दुचाकीवरून एक संशयित त्या ठिकाणी आला. त्याने, माझ्या मित्राचे घर येथेच आहे, तुम्हाला पत्ता माहीत आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर महिलेचे लक्ष नसल्याचे पाहून त्याने तिच्या गळ्यातील दागिने ओढले.
यावेळी महिलेने दागिना हातात धरून ठेवला. त्यामुळे 98 हजार रुपये किमतीचा तुटलेला दागिन्याचा भाग घेऊन चोरट्याने पलायन केले. याबाबत अज्ञाताविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.