

अंकली : सुनेला मुले न झाल्याने सासू, सासरा व तिच्या पतीने मिळून विवाहितेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना अथणी तालुक्यातील मलाबाद गावात घडली. रेणुका संतोष होनकांडे (वय 27) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
17 मे रोजी रात्री मलाबाद येथील कामण्णा होनकांडे व त्याची पत्नी जयश्री यांनी आपली सून रेणुका होनकांडे हिला दुचाकीवरून नेऊन रस्त्याच्या मध्यभागी उतरले. त्यानंतर झुडपात नेऊन तिच्या डोके दगडाने ठेचून व गळा आवळून मारले. त्यानंतर मृतदेह पुन्हा दुचाकीजवळ आणून दुचाकीच्या मागील चाकामध्ये साडी अडकल्याचे भासवून मृतदेह 200 फूट फरफटत नेला.सदर अपघात झाल्याचे भासवण्यात आले.