

मिरज : आई व भावासोबतचा वाद मिटविण्याच्या बहाण्याने जातीवाचक शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांचे पती अभिजित मल्लिकार्जुन हारगे (वय 43, रा. बुधवार पेठ, मिरज) व आकाश राजू कांबळे (वय 30, रा. वेताळनगर, मिरज) या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती (जि. पुणे) येथे सासरी राहणारी महिला दि. 18 जूनरोजी मध्यरात्री साडेबारा वाजता मिरजेत आली होती. बुद्ध विहाराजवळील कमानीजवळ अभिजित हारगे व आकाश कांबळे त्यांना भेटले. दोघांनी वाद मिटविण्याच्या बहाण्याने महिलेस मिरजेत बोलावले. मात्र तेथे पोहोचल्यावर हारगे व कांबळे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.