

सांगली : येथील माधवनगर जकात नाक्यासमोरील शिवोदयनगरजवळील म्हाडा हौसिंग प्रकल्पाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत महिलेने जीवन संपवले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. सुलभा बाळासाहेब सपकाळ (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.
सुलभा सपकाळ या पती, मुलींसह म्हाडा प्रकल्पातील फ्लॅटमध्ये राहत होत्या. गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सुलभा यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. संजयनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.