Sangli chain snatching: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी लंपास

सांगलीतील पंचमुखी मारुती रोडवरील घटना
Chain Snatching
Chain SnatchingPudhari
Published on
Updated on

सांगली : शहरातील वर्दळीच्या पंचमुखी मारुती रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चेन) हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. धनलक्ष्मी बाबासाहेब विपट (वय 26, रा. प्रसन्न अपार्टमेंट, राजवाडा) यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेअर मार्केटच्या क्लासचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्याने हा प्रकार केला.

फिर्यादी महिला पंचमुखी मारुती रोडने चालत जात होती. त्या गोल्डन सप्लिमेंट दुकानाजवळून जात असताना, मागून आलेल्या 20 ते 25 वर्षे वयोगटातील एका तरुणाने त्यांना गाठले. ‌‘येथे शेअर मार्केटचे क्लास कोठे आहेत?‌’ असे विचारून या तरुणाने महिलेचे लक्ष विचलित केले. ही महिला पत्ता सांगत असतानाच चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीवर झडप घातली आणि जोरदार हिसका मारून ती तोडली. साखळी हिसकावल्यानंतर हा चोरटा काही अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसला. आणि दोघेही राममंदिरच्या दिशेने दुचाकीवरून सुसाट वेगाने पसार झाले.

भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. पोलिस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी बोलताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news