Sangli Crime : सांगलीत महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला

स्टॉलवर माशांचा वास येत असल्याच्या कारणावरून प्रकार
Crime News
Crime NewsPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

​सांगली : शहरातील विजयनगर चौक ते रेल्वे ब्रीज रस्त्यावर माशांचा स्टॉल लावल्याच्या वादातून एका टोळक्याने स्टॉलचालक महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोरांनी स्टॉलचे सामान, मोबाईल आणि परिसरातील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवीणा शिवराज जावीर (वय ३९, रा. संजीवन हनुमान मंदिरामागे, विनायकनगर, सांगली) असे जखमी स्टॉलचालक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार सीता अभय म्हारुगुडे (रा. संजयनगर) व तीन अनोळखीविरुद्ध गंभीर मारहाण व तोडफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विजयनगर येथील गोल्डन ओम अपार्टमेंटच्या शॉप नंबर ८ समोर प्रवीणा जावीर यांनी माशांचा स्टॉल लावला होता. याचदरम्यान, समोरील रस्त्यावर केळी विकणारी सीता म्हारुगुडे हिने आपल्या ओळखीच्या तीन तरुणांना तिथे बोलावून घेतले. ‘आम्हाला तुमच्या माशांचा वास येत आहे, तुम्ही येथे मासे विकायचे नाहीत’, असे म्हणत त्यांनी प्रवीणा आणि त्यांच्या पतीला दमदाटी करत शिवीगाळ व मारहाण सुरू केली.

वाद विकोपाला गेल्यावर टोळक्यातील एकाने स्टॉलवर असलेला चाकू उचलून प्रवीणा यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. तसेच लोखंडी खुर्ची डोक्यात मारून त्यांना जखमी केले. स्टॉलमधील गॅस शेगडी, टेबल आणि माशांची नासधूस केली. प्रवीणा व त्यांच्या पतीकडील तीन मोबाईल जमिनीवर आदळून फोडले. जाताना पार्किंगमध्ये लावलेल्या ग्राहकांच्या दुचाकी लाथा मारून खाली पाडल्या. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.