विटा : पुढारी वृत्तसेवा
विट्यातील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सोयी, सुविधा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
तब्बल १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच प्रवेशद्वार त्याच बरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, युवा नेते सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख आनंदराव पवार तसेच विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, विटा बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक विद्या कदम, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक विजय मोरे, रमेश कांबळे, रोहित गुरव, विनायक माळी, सुशांत पाटील, रमेश पाटील यांच्यासह इतर परिवहन महामंडळाचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.