Sangli News : रणधुमाळी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात?

हिवाळी अधिवेशनामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लांबण्याची शक्यता ः व्यक्तहोत आहेत तर्कविर्तक
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

सांगली ः राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. 3 डिसेंबररोजी याचा निकाल लागणार आहे. मात्र दि. 8 ते 19 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होणार असल्याचे बोलले जाते आहे. या कालावधीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिनी मंत्रालयासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे बिगुल वाजल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. प्रशासनाकडूनसुद्धा तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 61 आणि पंचायत समितींचे 122 गण आहेत. जिल्हा प्रशासनाने गट आणि गणांचे अंतिम आरक्षण काही दिवसांपूर्वीची निश्चित केले आहे. त्यामुळे सोयीचे आरक्षण पडलेल्या ठिकाणी उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच सोयीचे आरक्षण न पडल्याने काहींनी इतर गटात निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समितीचे बिगुल कधी वाजणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. राजकीय तज्ज्ञांकडून निवडणुकीबाबत वेगवेगळे अंदाजही व्यक्त करण्यात येत आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक आणि हिवाळी अधिवेशनाचा विचार केल्यास डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

स्थानिक संस्थांच्या निवडणुका दि. 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक, अधिवेशन याचा विचार केल्यास निवडणूक आयोग जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे, तसा काही अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.

इच्छुकांनी संपर्क वाढवला ः उमेदवारीसाठी फिल्डिंग

गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली नाही. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांकडे फि ल्डिंग लावण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असे गृहीत धरून काहींनी संपर्क वाढविला आहे. नेतेमंडळींनीदेखील उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. युती, आघाडी किंवा स्वबळावर लढण्यासाठी तयारी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news