सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था होणार का?

विश्वजित कदम यांचा सवाल : द्राक्षे व बेदाणे उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक थांबवा
Vishwajit Kadam News
विश्वजित कदम Pudhari News Network
Published on
Updated on

कडेगाव : नाशिकनंतर सांगली जिल्हा हा देशातील सर्वात मोठ्या द्राक्ष उत्पादकांपैकी एक आहे. मात्र, हवामान बदल आणि रासायनिक अवशेषांचे (रेसिड्यू) संकट द्राक्ष उत्पादकांसमोर भीषण समस्या निर्माण करत आहे. याच पार्श्वभूमीवर, सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था होणार का? अशी विचारणा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत सरकारकडे केली.

कदम म्हणाले, नाशिक जिल्ह्याप्रमाणेच सांगलीतील शेतकर्‍यांनाही द्राक्षपिकाविषयी विज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता आहे. सरकार यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे? याबाबत शेतकर्‍यांमध्ये उत्सुकता आहे. याशिवाय, बेदाणे उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यापार्‍यांकडून होणार्‍या फसवणुकीचा मुद्दाही कदम यांनी विधानसभेत लावून धरला. बेदाण्याच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून ठोस नियमन होणार आहे का? असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news