मुंडेंचा सांगलीतील आका कोण?

करुणा शर्मांच्या आरोपामुळे संशयकल्लोळ
Dhananjay Munde
मंत्री धनंजय मुंडे(source- @dhananjay_munde)
Published on
Updated on

मुंबई / सांगली ः धनंजय मुंडे यांच्या गँगमध्ये वाल्मिक कराडसारखे अनेक लोक आहेत. पुणे, संभाजीनगर आणि सांगलीतदेखील आका आहेत, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्यामुळे आता मुंडेंचा सांगलीतील आका कोण, याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. माझ्याकडे सर्वांचे पुरावे असून लवकरच ‘आकां’ची नावे सांगणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांचे सांगलीशी नाते आहे. त्यात आता करुणा मुंडे यांनी सांगलीतही आका असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या दाव्याची जिल्ह्यात चर्चा सुरू असून, सांगलीचा आका कोण, याची उत्सुकता लागली आहे. करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराडवर आरोप करताना धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. धनंजय मुंडे यांच्याकडे आका काही कमी नाहीत. त्यांच्याकडे अनेक आका आहेत. माझ्याकडे धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अनेक आर्थिक घोटाळ्यांची माहिती आहे. वेळ आली, तर मी सगळी माहिती बाहेर काढेन. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीतही त्यांचे आका आहेत. लवकरच त्यांची नावे सांगणार असल्याचेही करुणा शर्मा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news