

सांगली : गेल्या तेरा दिवसात जिल्ह्यात सरासरी 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर ओसरल्याने वारणा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत उतार झाला आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीच्या पातळीत चार दिवसात जवळपास 6 फुटांनी घट झाली आहे. रविवारी पातळी 13 फूट 3 इंच होती. सद्या जिल्ह्यातील धरणे 70 ते 75 टक्के भरली आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून बहे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ आणि राजापूर (कोल्हापूर) बंधारा पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील धरणे सुमारे जवळपास 70 टक्क्याहून अधिक आहेत. वाळवा, तासगाव, कडेगाव, मिरज आदी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. आटपाडी, जत तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली आहे.
आयर्विन पूल : 13.3 फूट
अंकली : 12.6 फूट
कृष्णा पूल (कराड) : 7.8 फूट