Walwa Election : वाळवा तालुक्याची 19 फेऱ्यांत मतमोजणी

पोस्टल मतमोजणीसाठी वेगळी पाच टेबल्स
Sangli News
वाळवा तालुक्याची 19 फेऱ्यांत मतमोजणीPudhari File Photo
Published on
Updated on

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 गटांची व पंचायत समितीच्या 22 गणांची मतमोजणी आज (सोमवारी) ईश्वरपूर येथील बहे रस्त्यानजीकच्या शासकीय धान्य गोदामात होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 22 टेबलांवर 19 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. पोस्टल मतमोजणीसाठी वेगळी पाच टेबल्स आहेत. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन निवडणूक निर्णय अधिकारी, तर तहसीलदार सारिका रासकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.

वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) व महायुती अशी सरळ लढत आहे. तालुक्यात चुरशीने 74.71 टक्के मतदान झाले आहे. 2 लाख 98 हजार 839 पैकी 2 लाख 23 हजार 248 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ईश्वरपूर येथील शासकीय गोदाम परिसरात ईव्हीएम यंत्र जमा करून घेण्यात आली. गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मताचा टक्का वाढला आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला मिळेल, याची उत्सुकता आहे. तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रशासनाने काल रविवारी मतमोजणीची तयारी पूर्ण केली. आज (सोमवारी) येथील शासकीय गोदामात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी 22 टेबले लावण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी असणार आहेत, तर पोस्टल मतदान मोजणीसाठी स्वतंत्र 5 टेबले आहेत. शासकीय गोदाम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news