Graduate & Teachers Constituency Election| वाळवा तालुक्यात ‘पदवीधर’साठी ५३.२, तर ‘शिक्षक’ला ८६ टक्के मतदान

४६ मतदान केंद्रांवर मतदारांचा उदंड प्रतिसाद
Voting for graduate and teacher constituencies
Voting for graduate and teacher constituenciesfile photo
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यात मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी सरासरी ५३.२ टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी चुरशीने सरासरी तब्बल ८६ टक्के मतदान नोंदवले गेले.

तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी २२,००६, तर शिक्षक मतदारसंघासाठी १,४९८ मतदारांची नोंदणी झाली होती. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पदवीधरसाठी ३८ आणि शिक्षकसाठी ८ अशा एकूण ४६ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. ईश्वरपूर व आष्टा शहरासह ताकारी, वाळवा, पेठ, कासेगाव, चिकुर्डे आणि येलूर या गावांमध्ये मतदान केंद्र सुरू होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २७६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी संथगतीने सुरू झालेल्या मतदानानंतर सकाळच्या सत्रात बहुतांश ठिकाणी ३० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले होते.

जत तालुक्यात ‘पदवीधर’साठी ६८.२१ टक्के मतदान

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जत तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदवीधर मतदारसंघासाठी तालुक्यात ३,१९६ पैकी २,१८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यामुळे ६८.२१ टक्के मतदान झाले, तर शिक्षक मतदारसंघात १,०१६ पैकी ९४२ मतदारांनी मतदान करत तब्बल ९२.७२ टक्के मतदानाची नोंद केली.

तालुक्यातील ६ प्रमुख केंद्रांवर ही निवडणूक पार पडली. पदवीधर मतदारसंघात उमदी केंद्रावर सर्वाधिक ७७.८७ टक्के (३४८ पैकी २७१), तर डफळापूर केंद्रावर सर्वांत कमी ५९.४४ टक्के (३२३ पैकी १९२) मतदान झाले. याशिवाय संख येथे ७४.७८ टक्के (३३७ पैकी २५२), जत येथे ६८.३८ टक्के (१,२०५ पैकी ८२४), माडग्याळ येथे ६८.०९ टक्के (३९८ पैकी २७१), आणि शेगाव येथे ६३.२५ टक्के (५८५ पैकी ३७०) मतदान नोंदवले गेले.

शिक्षक मतदारसंघासाठी उमदी केंद्रावर सर्वाधिक ९६.५७ टक्के (२०४ पैकी १९७), डफळापूर येथे ९६.१५ टक्के (५२ पैकी ५०), माडग्याळ येथे ९४.१२ टक्के (८५ पैकी ८०), शेगाव येथे ९३.४६ टक्के (१५३ पैकी १४३), संख येथे ९२.५५ टक्के (१६१ पैकी १४९), तर जत केंद्रावर ८९.४७ टक्के (३६१ पैकी ३२३) मतदान झाले. आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रम सावंत डॉ. रवींद्र आरळी यांच्यासह नेतेमंडळींनी मतदान केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news