Sangli News : वाळवा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक

प्रशासकीय स्तरावर प्रारूप मतदार यादी जाहीर
Sangli News
वाळवा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक
Published on
Updated on

बोरगाव : वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांनी रिक्त झालेल्या सात ग्रामपंचायत सदस्य व एक लोकनियुक्तसरपंच, अशा पदांसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. त्यासाठी प्रशासन स्तरांवर मतदार यादी जाहीर करण्यात आली.

शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारीअखेर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. मंगळवार, दि 24 फेब्रुवारीरोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या रिक्तपदांसाठी लवकरच पोटनिवडणुकीची घोषणा होणार आहे.

मालेवाडी येथील प्रभाग एक मधील अनुसूचित जाती महिला, चिकुर्डे येथील प्रभाग तीन मधील सर्वसाधारण महिला, या प्रवर्गासाठी आरक्षित जागा सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्तआहेत. बोरगाव येथील प्रभाग एक मधील सर्वसाधारण व ऐतवडे खुर्द येथील प्रभाग दोन मधील सर्वसाधारण (खुल्या) या दोन जागांवरील सदस्यांचे निधन झाल्याने या जागा रिक्तआहेत. याशिवाय तांदूळवाडी येथील प्रभाग एक मधील सर्वसाधारण सदस्यपद उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रिक्त आहे. इटकरे येथील प्रभाग चार मधील सर्वसाधारण सदस्यपद रिक्तआहे. साटपेवाडी येथील प्रभाग तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ही जागा उमेदवारच न मिळाल्यामुळे रिक्तआहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news