

इस्लामपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा इस्लामपूरतर्फे दिला जाणारा यंदाचा रंगकर्मी पुरस्कार नाट्यकर्मी वृषाली आफळे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती सल्लागार प्रा. शामराव पाटील व अध्यक्ष डॉ. सूरज चौगुले यांनी दिली.
पुरस्कार सोहळा 4 नोव्हेंबररोजी सायंकाळी 5 वाजता राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी सभागृह, इस्लामपूर येथे होणार आहे. यावेळी 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याहस्ते आफळे यांना गौरविण्यात येणार आहे.