Vita Theft: विट्यात दोन लाखांची चांदी लांबविणाऱ्या महिलेस अटक

विट्यात घरफोडी करून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा चांदीचा रथ लांबवणाऱ्या महिलेस पोलिस प्रशासनाने तत्काळ अटक केली
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

विटा : विट्यात घरफोडी करून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा चांदीचा रथ लांबवणाऱ्या महिलेस पोलिस प्रशासनाने तत्काळ अटक केली आहे. पूजा काकासाहेब माने (वय ३५, रा. जुना वासुंबे रोड, विटा) असे संशयित महिलेचे नाव असून तिच्याकडून १ किलो ६९५ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हेमंत अशोक लाटणे यांनी विटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत लाटणे यांनी साक्षीदार मनीषा तारळेकर यांच्या मालकीचा चांदीचा रथ काचेची फ्रेम बनवण्यासाठी घरी आणून कपाटात ठेवला होता. २० जुलै रोजी सायंकाळी हेमंत यांची पत्नी घरी नसल्याचा गैरफायदा घेऊन संशयित पूजाने घरात प्रवेश केला आणि कपाटातील १ लाख ९९ हजार रुपये किमतीचा चांदीचा रथ चोरून नेला.

घटनेची नोंद होताच सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तपासाचे आदेश दिले. यादरम्यान पोलिस अंमलदार अभिजित कोळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक जयश्री कांबळे व पथकाने संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याने तिला अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस अंमलदार अमोल पाटील, उत्तम माळी, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, किरण खाडे, विलास मोहिते, अभिजित कोळी व वैभव कोळी यांनी केली. तपास उपनिरीक्षक संग्राम पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news