Sangli Crime : विट्यात नशेची 50 इंजेक्शन हस्तगत; एकास अटक

विटा पोलिसांची कारवाई
Narcotic Injection
नशेची इंजेक्शन
Published on
Updated on

विटा : शरीर पिळदार बनवण्याच्या नादात असलेल्या तरुणांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका संशयिताला विटा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. रोहित करण जावीर (वय 25, रा. गार्डी, ता. खानापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 18 हजार 950 रुपये किमतीच्या मेफेन्टरमाइन सल्फेट या घातक औषधांच्या 50 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

विटा शहरात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास विटा बसस्थानक रिसरात रोहित जावीर संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्याच्याकडे मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 50 सीलबंद बाटल्या सापडल्या. यामध्ये टर्मिनस (21 बाटल्या) आणि टर्मिट्र (29 बाटल्या) या घातक इंजेक्शन्सचा समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत रोहितने ही औषधे धीरज शर्मा (रा. मध्यप्रदेश) याच्याकडून मागवल्याची कबुली दिली आहे. पोलिस आता या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार धीरज शर्मा याचा शोध घेत आहेत. विटा परिसरात हे इंजेक्शन्स जिममध्ये जाणारे युवक आणि विद्यार्थी नशा करण्यासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अमोल पाटील, विलास मोहिते, अक्षय जगदाळे, उत्तम माळी, महेश देशमुख, संग्राम जाधव, किरण खाडे, महेश संकपाळ, वैभव कोळी, सतीश आलदर तसेच सायबरचे कॅप्टन गुंडवाडे आणि इम्रान महालकरी यांच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास उपनिरीक्षक पूजा महाजन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news