

Burglary Solved In 9 Hours
विटा : बलवडी (खा.) येथे झालेली पावणे नऊ लाखां ची घरफोडी चोरी विटा पोलिसांनी नऊ तासांत उघडकीस आणली. याप्रकरणी शहाजी नंदकु मार मंडले (वय ३१ रा.अग्रणी मळा खानापूर) आणि नितीन मल्हारी ठोंबरे (वय ३० रा.चोपडे वाडी, खानापूर) या दोघांना अटक करण्यात आले आहे. याबाबत शांताबाई दिनकर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी भर दुपारी दोन ते चारच्या दरम्यान घडली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बलवडी (खा.) येथे गावकुसवालगत शांताबाई जाधव यांच्या बंद घरातील सोनेचांदी चे दागिने आणि रोकड रक्कम अशी एकूण ८ लाख ६६ हजार ८२१ रूपयांची चोरी झाली होती. ही घटना १५ ऑगस्ट रोजी भर दुपारी घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाच्या तपासाचे अनुषंगाने विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खानापुर पोलीस दुरक्षेत्राकडील पथकास तपा साच्या सुचना दिल्या होत्या. त्यावर खानापूरचे पोलीस अंमलदार आण्णासो भोसले यांना टीप मिळाली की, या घरफोडी मधील मुद्देमाल विक ताना दोन व्यक्ती भिवघाट येथील एका अॅटो सर्व्हीसेस सेंटर शेजारच्या एका नाष्टा सेंटर जवळ थांबलेले आहेत.
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांचे पथक भिवघाटकडे त्वरित रवाना झाले. या पथकात हवालदार आण्णासो भोसले, रमेश चव्हाण, सयाजी पाटील, सुहास चव्हाण, सुरेश पाटील, महादेव चव्हाण, जयकर ठोंबरे, प्रशांत जाधव, पोलीस अमोल नलवडे, शशीकांत झांबरे आणि शिवाजी हुबाले यांचा समावेश होता. या पथकाने भिवघाट येथे जाऊन त्यांना गराडा घातला आणि ताब्यात घेतले. तेव्हा त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव शहाजी मंडले आणि नितीन ठोंबरे असल्याचे सांगितले. यावर अधिक चौकशी करून झडती घेतली असता सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम सापडली. तसेच त्यांनी हा मुद्देमाल बलवडी (खा) येथील घरातून चोरला असल्याची कबुली दिली.दरम्यान, घरफोडीतील मुद्देमाल आणि हा जप्त केलेला मुद्देमाल मिळता जुळता असल्याने या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, शांताबाई जाधव यांच्या घरातून या चोरट्यांनी दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये पत्र्याच्या पेटीत ठेवलेले चार लाख त्र्यानव हजाराचे अठ्ठावीस ग्रॅमचे सोन्याचे गंठण, पंच्याऐंशी हजाराची दहा ग्रॅमची सोन्याची बोरमाळ, एकवीस हजार दोनशे पन्नास रूपयांची दोन ग्रॅम पाचशे मिली वजना ची सोन्याची अंगठी, बावन हजार सातशे रूपयांचे सहा ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, सतरा हजाराचे दोन ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, एकोण पन्नास हजार तीनशे रूपयांचे पाचशे ऐंशी ग्रॅमचे चांदीचे सात जोड पैंजण, दोन हजार सहाशे रूपयांच्या तीस ग्रॅम सहाशे मिली वजनाच्या मासोळ्या, अकरा हजार एकशे सव्वीस रूपयांचा एकशे तीस ग्रॅम नऊशे मिली वजना चा कंबर पट्टा, दोन हजार पाचशे पन्नास रूपयांचे तीस ग्रॅमचे चांदीचे बिस्कीट, तीनशे चाळीस रुपयांचे चार ग्रॅमचे चांदीचे बिस्कीट, एक हजार नऊशे पचावन रूपयांच्या तेवीस ग्रॅमच्या तीन चांदीच्या गणपती मुर्ती, रोख एक लाख तीस हजार रुपये असा ८ लाख ६६ हजार ८२१ रूपयांचा सोन्याचांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता. तो पुन्हा हस्तगत करण्यात विटा पोलिसांना यश आले.गुन्हा दाखल झाल्या पासून ९ तासाच्या आत १०० टक्के मुद्देमाला सह विटा पोलिसांनी घरफोडी उघडकीस आणली आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल येळेकर अधिक तपास करत आहेत.