Vita Murder: बहिणीला अपशब्द वापरल्याने एकाचा खून

परप्रांतीय मजुरांच्या वादातून चाकूने वार; कार्वे येथील घटना
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

विटा : खानापूर तालुक्यातील कार्वे येथे बहिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून दोन परप्रांतीय मजुरांमध्ये झालेल्या वादावादीत चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना सोमवार, दि. 13 रोजी दुपारी घडली. विजय माणिक पानसे (वय 26) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बोअरिंग मशिन चालक जयवंत नारायण देशमुख (रा. माधवनगर, ता. मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रोशन चौहान (रा. सुनालोमा बुरडोना, जि. बैतुल) यास अटक केली आहे.

कार्वे (ता. खानापूर) गावाच्या हद्दीतील एका शेतातील विहिरीत बोअर खोदाईचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. या कामासाठी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मजूर आलेले आहेत. सोमवारी दुपारी कामाची सुट्टी झाल्यानंतर सर्व मजूर जेवणासाठी जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जमले होते. जेवण आटोपल्यानंतर काही मजूर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतले, तर विजय पानसे आणि रोशन चौहान तिथेच थांबले होते. यावेळी विजय याने रोशनच्या बहिणीबद्दल अपशब्द वापरले. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.

हा वाद इतक्या टोकाला गेला की, रागाच्या भरात रोशन याने जवळच असलेला आंबा कापण्याचा चाकू उचलला आणि विजय याच्या छातीवर सपासप वार केले. वर्मी वार झाल्याने रक्तबंबाळ होऊन विजय याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. संशयित रोशन यशवंत चौहान यास पोलिसांनी अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news