Vita vaccination death: लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू

विट्यात खळबळ; नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप
Vita vaccination death: लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू
Published on
Updated on

​विटा : विटा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केल्यानंतर अवघ्या काही तासांतच चार महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी बालिकेचा मृतदेह मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी विटा ग्रामीण रुग्णालयात सोना तिरुपती राठोड या चार महिन्यांच्या बालिकेला लसीकरणासाठी आणण्यात आले होते. तेथे तिला पेंटा-१, आयपीव्ही, रोटा-१ आणि पोलिओ हे लसींचे डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर बालिकेला ताप आला होता आणि ती रात्रभर अस्वस्थ होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास तिचा अचानक मृत्यू झाला. यानंतर नातेवाइकांनी मृत बालिकेला घेऊन विटा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. लस घेतल्यानंतर बालिकेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने रुग्णालयाच्या आवारात गर्दी झाली. नातेवाईकांसह जमावाने तीव्र संताप व्यक्त केला.

या संदर्भात विटा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी पवार म्हणाल्या, सोमवारी दिवसभरात २५ बालकांचे लसीकरण झाले. संबंधित बालिकेला सकाळी दहाच्या सुमारास लस दिली होती, त्यावेळी तिला कोणताही त्रास नव्हता. इतर बालकांनाही कोणताही त्रास झालेला नाही. मंगळवारी पहाटे बालिकेला मृतावस्थेतच रुग्णालयात आणले गेले. घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, लसीकरण केलेल्या इतर २५ बालकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे उत्तरीय तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news