Vita Accident: विट्यात अपघातात एकाचा मृत्यू

पिकअप्‌‍च्या धडकेनंतर दुचाकी पेटली
Vita Accident
Vita AccidentPudhari
Published on
Updated on

विटा : विटा-तासगाव रस्त्यावर रात्री साडेसातच्या सुमारास एका भीषण अपघातात 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विटा शहराकडून तासगावच्या दिशेने जात असताना एका भरधाव पिकअपने (क्रमांक एम एच10 सी आर 1371) दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअपने दुचाकीला रस्त्यावरून बराच वेळ फरफटत नेले.

या घर्षणामुळे दुचाकीची पेट्रोल टाकी फुटून गळती लागली आणि रस्त्यावर झालेल्या ठिणग्यांनी दुचाकीने अचानक पेट घेतला. या अग्नितांडवात दुचाकीस्वाराचा छातीपासून खालचा भाग गंभीररीत्या भाजला. तसेच, रस्त्यावर डोके आपटल्याने त्याच्या कानामागे गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून पेटलेल्या दुचाकीवरून त्याला बाजूला ओढले, मात्र प्रचंड मार आणि आगीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पिकअप चालक वाहन सोडून फरार झाला असून, विटा अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. विटा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम रात्री उ शिरापर्यंत सुरू होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news