

सांगली : माधुरी हत्तीण परत नांदणी मठात यावी, यासाठी जैन समाजासह सर्वधर्मियांनी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. या हत्तीणीला परत आणण्याच्या लढ्यात आणि ती परत आल्यानंतर तिची सर्वोत्तम सोय करण्यात आमचा सक्रिय सहभाग राहील, अशी ग्वाही खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी दिली. रविवारी दुपारी नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी न्यायालयीन पातळीवर, केंद्र सरकारच्या पातळीवर जी काही लढाई आवश्यक आहे, त्यात काँग्रेस पक्ष म्हणून आणि व्यक्तिगत स्वरूपात कदम आणि पाटील कुटुंबीय म्हणून आम्ही सोबत आहोत. हत्तीण परत आल्यानंतर तिच्या सोयी-सुविधांसाठी जे काही आवश्यक असेल, त्यासाठी आमचा पुढाकार असेल, अशी ग्वाहीदेखील दिली.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार नांदणी ते कोल्हापूर निघालेल्या पदयात्रेत खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांनी सहभाग घेतला. यादरम्यान त्यांनी शेट्टी यांच्याशी चर्चा केली.