मिरज रेल्वे जंक्शनबाबत दुजाभाव का? : विशाल पाटील

पुण्यात रेल्वेची बैठक; गैरसोयींच्या प्रश्नावर विचारला जाब
Vishal Patil
पुणे : रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात येथील बैठकीत उपस्थित खासदार विशाल पाटील, शेजारी अन्य अधिकारी.
Published on
Updated on

सांगली : मिरज रेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र या ठिकाणी अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यात रेल्वेने नेहमीच आखडता हात घेतला आहे. त्याचा तातडीने विचार करावा आणि जंक्शन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी पुण्यात सोमवारी पुणे, सोलापूर मंडलमधील खासदारांसोबत झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली.

रेल्वेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती आराखडा बनवण्यासाठी ही बैठक झाली. खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते, डॉ. शिवाजी काळगे, रजनी पाटील, नितीन पाटील, मेधा कुलकर्णी, भाऊसाहेब वाघचौरे, नीलेश लंके, डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार विशाल पाटील म्हणाले, मिरज रेल्वे जंक्शनवर फलाट क्र. एक वगळता 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड अपुरे आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होते. सरकता जिना नाही. बॅगा घेऊन जाणे अडचणीचे होते. फक्त एक, तीन, चार क्रमांकाच्या फलाटावर लिफ्ट आहेत. अन्यत्र त्या बसवायला हव्यात. पॅसेंजर गाड्या फलाट 5, 4 व 2 या ठिकाणी उभ्या केल्याने दिव्यांग व ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होतात. पार्किंगचा प्रश्न तसाच आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. फर्स्ट क्लाससाठी प्रतीक्षा कक्षाचा अभाव आहे. पिटलाईनचे काम पूर्ण नाही. जंक्शनमधील मॉलचे काय झाले कळत नाही. मिरज मॉडेल स्थानकाचे काम लवकर सुरू करावे. सांगली-परळी एक्स्प्रेस डेमूऐवजी आयसीएफ डब्यांची सोडावी. भिलवडी स्थानकावर एफओबी बांधावी. ताकारी रेल्वे स्थानकास महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेसचा थांबा द्यावा. मिरजमधून बेळगाव, लोंढा, कॅसलरॉक, हुबळीसाठी पॅसेंजर धावते. त्या धर्तीवर पंढरपूर, कुर्डूवाडी, सातारा पॅसेंजर सुरू कराव्यात.

प्रमुख मुद्दे...

  • जत-विटा-कराड रेल्वे लाईनसाठी सर्वेक्षण वेगाने करून निर्णय घ्यावा

  • मिरज ते कोल्हापूर, मिरज ते पंढरपूर, मिरज ते पुणे या रेल्वे लाईनवरील नवीन गाडी, पूल बांधकाम, अंडरपास रोड पावसाळ्यात पाण्याने भरून जातात, त्यावर उपाययोजनांची मागणी

  • खासदारांच्या पत्रावर रेल्वेत तिकिटांचा काळाबाजार होतो, तो थांबवण्याची सूचना

  • कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित

  • किर्लोस्करवाडी, वसगडे येथील पुलाचे काम अपूर्ण का? सांगलीत चिंतामणीनगर पुलावर पथदिवे का नाहीत?

  • सांगली रेल्वे स्टेशनवर मालधक्क्यावर लागणार्‍या रेल्वेंना प्लॅटफॉर्म, रॅक लवकर मिळत नाहीत. त्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते.

सांगलीच्या सुविधांबाबत आग्रह...

  • सांगली रेल्वे स्टेशनवर टर्मिनल कोचिंग पिटलाईन व रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा निर्माण करणे

  • हुबळी-सांगली-पुणे रेल्वे मार्गावर सुरू होणार्‍या सर्व नवीन गाड्यांना सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देणे

  • सांगली रेल्वे स्थानकावर निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांतीचा थांबा देणे

  • सांगली रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांना सोलापूर,अक्कलकोट, गाणगापूर, कलबुर्गीला जाता यावे यासाठी कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देणे

  • कर्नाटकातून येणार्‍या बर्‍याच रेल्वे गाड्या उगार व मिरज तालुका यादरम्यान थांबून असतात. या गाड्यांना पुढे सांगली रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करून विश्रामबाग स्टेशनवर थांबा द्यावा

  • सकाळी सुटणारी कुर्डूवाडी-मिरज पॅसेंजर गाडी सांगली रेल्वे

  • स्टेशनवरून सोडावी

  • आषाढी एकादशीनिमित्त सुटणार्‍या पंढरपूरला जाणार्‍या विशेष गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सोडल्यास भाविकांची सोय होईल

  • हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला किर्लोस्करवाडी व कराड रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा

  • सकाळची कोल्हापूर-मिरज पॅसेंजर गाडी पुढे किर्लोस्करवाडीपर्यंत सोडावी व या गाडीला विश्रामबाग, सांगली, माधवनगर, नांद्रे, भिलवडी, आमणापूर येथे थांबा द्यावा

  • सांगली रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम तसेच पार्सल बुकिंगची सुविधा करण्यात यावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news