Sangli Crime : आरगमध्ये दोन कुटुंबात जोरदार मारामारी

एकावर चाकूहल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Sangli Crime News
आरगमध्ये दोन कुटुंबात जोरदार मारामारीFile Photo
Published on
Updated on

मिरज : आरग (ता. मिरज) येथे दोन कुटुंबात जोरदार मारमारीचा प्रकार घडला. यावेळी झालेल्या चाकूहल्ल्यात शशिकांत सिन्ना पवार (वय 25, रा. आरग, ता. मिरज) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबाकडून परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शशिकांत पवार याने राजेशखन्ना लसमाप्पा पवार आणि विद्यासागर राजेशखन्ना पवार, तर राजेशखन्ना लसमाप्पा पवार याने शशिकांत सिन्ना पवार, सिन्ना लसनाप्पा पवार (चौघे रा. आरग) यांच्याविरुद्ध परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. शशिकांत याच्या फिर्यादीनुसार, तो दि. 6 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कुटुंबासमवेत जेवण करीत होता. त्यावेळी राजेशखन्ना आणि सागर हे दोघे त्याच्या घराजवळ आले. त्यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत शशिकांत याने विचारणा केल्यानंतर त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला, तर भांडण सोडविण्यास शशिकांत याची आई मंथू आणि बहीण निकिता यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असे त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

राजेशखन्ना याने दिलेल्या तक्रारीत, निकिता हिचे बाहेर प्रेमसंबंध सुरू आहेत, असे सांगण्यासाठी विद्यासागर हा शशिकांत याच्या घराजवळ गेला होता. त्यावेळी तुला काय करायचे आहे, असे म्हणून शशिकांत आणि सिन्ना या दोघांनी त्याला बेदम मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे. याबाबत दोन्ही कुटुंबांच्या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news