Pistol smuggling : पिस्तूलची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

तासगावमधील वासुंबे येथे एलसीबीची कारवाई : पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
Pistol smuggling
Pistol smuggling: पिस्तूलची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकPudhari
Published on
Updated on

सांगली : वासुंबे (ता. तासगाव) येथे पिस्तूलची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली. मार्तंड विठ्ठल पवार (वय 34) आणि सागर दीपक भोरे (33, दोघे रा. मतकुणकी, ता. तासगाव) अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

सांगली जिल्ह्यामध्ये पिस्तूल बाळगणारे व त्याची तस्करी करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांना दिले होते. यानुसार पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक नियुक्त केले होते.

सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर हे पिस्तूल तस्करीबाबत माहिती घेत असताना तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथील दोघांकडे विनापरवाना पिस्तूल आहे, त्याची तस्करी करण्यासाठी ते दोघे वासुंबे गावाजवळ येणार असल्याची माहिती कळेकर यांच्या पथकास मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी वासुंबे फाटा ते वासुंबे या गावादरम्यान असणाऱ्या एका अंगणवाडी जवळ मार्तंड पवार आणि सागर भोरे हे दोघे थांबले असल्याचे निदर्शनास आले.

पथकाने तातडीने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस मिळून आले. यावेळी चौकशी केली असता सागर भोरे याने हे पिस्तूल पुण्यातील अमोल नामक व्यक्तीकडून खरेदी करून जादा दराने विक्री करण्यासाठी मार्तंड पवार यांच्याकडे दिले असल्याचे त्याने कबूल दिली. पथकाने दोघांना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news