सांगली : ट्रक घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पीडित विवाहितेचा पती नवनाथ भिकू आगलावे (36), दीर पंढरी भिकू आगलावे (38) आणि बापू भिकू आगलावे (40, रा. सोनंद, ता. सांगोला) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विवाहिता दीपाली नवनाथ आगलावे सध्या गव्हर्न्मेंट कॉलनीतील स्फूर्ती चौक परिसरात राहतात. त्या धुणी-भांडी आणि मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी पती आणि दोन दिरांविरोधात फिर्याद दिली आहे. 2021 पासून ट्रक खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, म्हणून पती व दिरांकडून शिवीगाळ, मारहाण केली जात होती. गणेशनगर व इतर ठिकाणी भाड्याने रहात असताना पतीने सतत छळ केला. गहाण ठेवलेले दागिने परस्पर सोडवून घेतले. मला आणि माझ्या मुलाला मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सुरु आहे.

