

जत : तिप्पेहळ्ळी (ता. जत) येथे हौदात बुडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. निशांत नीलेश शिंदे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. शुक्रवार, दि. 25 रोजी दुपारी ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी निशांत हा घरासमोर खेळत होता. अचानक तोल गेल्याने तो पाण्याने भरलेल्या हौदात पडला. यावेळी घरातील पुरुष कामानिमित्त गावाबाहेर होते, तर महिला घरकामात व्यस्त होत्या. त्यामुळे निशांत पाण्यात पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशांत दिसून न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता, घराशेजारील हौदात तो निपचित पडलेला आढळून आला. तत्काळ त्याला जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.